Hrithik Roshan च्या चाहत्यांना त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याकडून ही अनोखी भेट | Lokmat News

2021-09-13 1

हृतिक रोशन याने साकारलेला हिंदुस्थानचा पहिला सुपरहिरो ‘क्रिश’ने बच्चे कंपनीला वेड लावले होते. क्रिश चित्रपट तर सुपरहिट झालाच पण सुपरहिरो म्हणून हृतिक देखील लोकांना प्रचंड आवडला होता. त्यामुळेच आता या चित्रपटाचे निर्माते व हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन यांनी क्रिश सिरीजचा चौथा भाग तयार करणार असल्याचे जाहीर केले आहे. हृतिक रोशनने त्याचा ४४ वा वाढदिवशी साजरा केला. त्यानिमित्ताने राकेश रोशन यांनी ट्विटरवरून क्रिश च्या चौथ्या भागाची घोषणा केली. ” क्रिशच्या चौथ्या भागाची औपचारिकरित्या घोषणा करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. ख्रिसमस २०२० ला चित्रपट प्रदर्शित होईल. हृतिकच्या चाहत्यांना त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याकडून ही भेटच आहे”, असे राकेश यांनी ट्विट केले आहे.



आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires